25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामा...म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!

…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!

एनआयएकडून प्रकरणाची चौकशी सुरू

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जानेवारी, मार्च महिन्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. शाकीर याचे संबंध जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्याशी असल्याचे समोर आले आहे.

शाकीरने नितीन गडकरी यांना दोन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. शाकीरचे संबंध जम्मू- काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबतही होते, असं तपासात समोर उघडकीस आलं आहे. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जानेवारी आणि मार्च महिन्यात जयेश पुजारीने धमकी दिली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शाकीर याने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करुन पहिल्यांदा शंभर कोटी आणि दुसऱ्यांदा दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास गडकरी यांना जीवे मारण्याची ही धमकी शाकीर याने दिली होती. पुढे नागपूर पोलिसांच्या तपासात धमकीचे कॉल बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते नंतर दोन्ही गुन्ह्यांमध्ये यूएपीए ही लावण्यात आला होता.

दरम्यान, नितीन गडकरी यांना धमकी का दिली याचा जबाब देताना शाकीर याने सांगितले की, “पीएफआय’वर बंदी येऊ शकते, तर ‘आरएसएस’ वर बंदी का नको? नितीन गडकरी हे संघाच्या फार जवळचे म्हणून त्यांना धमकी दिली.”

हे ही वाचा:

विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार

आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल

बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार; जाहीर झाले बेलआऊट पॅकेज

भारत- फ्रान्स यांच्यात ९० हजार कोटींचा संरक्षण करार होणार?

अफसर पाशा कोण आहे?

बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा २०१२ मध्ये जम्मू- काश्मीरमध्ये लष्कर- ए- तोयबासाठी दहशतवाद्यांच्या भरती प्रकरणातला दोष सिद्ध आरोपी आहे. तसेच तो बंगळूरू बॉम्ब ब्लास्टमधील दोषी आहे. ईडीच्या पीएलएमए कायदे अंतर्गतही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोष सिद्ध आरोपी आहे. शाकीरचे अफसर पाशा या कुख्यात दहशतवाद्यासोबतच्या संपर्काचे काही पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले आहेत. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा बेळगावच्या हिंदलगा तुरुंगात कैदेत आहे. त्याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा