नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची कोणी दिली धमकी ?

धमकी देणाऱ्याने मागितली २ कोटी रुपयांची खंडणी

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची  कोणी दिली धमकी ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना ३ वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. धमकी देणार्याने २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामला परिसरातील कार्यालयामध्ये आज सकाळी धमकीचे फोन आले. सकाळी ११.३०वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी फोन करण्यात आले. फोन करून गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली. एकूण ३ वेळा फोन करण्यात आले होते. ११.३० आणि १२.४० मिनिटाने फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता. २ कोटी रुपये द्या नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. न्यूज १८ लोकमतने  बातमी दिली आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

या फोन कॉलनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. फोन कुठून आला, कुणी केला आणि का केला, याचा तपास पोलीस घेत आहे. सायबर पोलिसांची एक टीम सुद्धा पोहोचली आहे. हा फोन कुठून आला होता. याचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत आणि चौकशी करत आहे. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.नागपूर कार्यालयात एटीएसचे पथक दाखल झाले आहे.

Exit mobile version