नितेश राणे शरण; पोलिसांनी केली कोठडीची मागणी

नितेश राणे शरण; पोलिसांनी केली कोठडीची मागणी

भाजपाचे आमदार नितेश राणे अखेर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयापुढे शरण आले आहेत. नितेश राणे यांनी जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर ते शरण आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयापुढे शरण जाण्यास सांगितल्यानंतर त्याप्रमाणे नितेश राणे यांनी शरण जाण्याचा निर्णय घेतला. आता नितेश राणे यांच्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यावर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे हे सिंधुदुर्ग न्यायालयापुढे शरण येणार असल्याचे सांगितले.

यासंदर्भात नितेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत मी शरण जात आहे. राज्य सरकारने मला वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणे यांची पोलिस कोठडी मागणार असल्याचे म्हटले आहे. आता न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू असून पोलिस तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

हे ही वाचा:

‘वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा असल्याचा ठाकरे सरकारला पवारांचा सल्ला’

‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

संजय राऊत, पटोलेंनी भाजपाला केले पराभूत

 

शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणात नितेश राणे यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यावर नितेश राणे काही काळ अज्ञातवासात होते. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावर ते १५ दिवसांनंतर माध्यमांसमोर आले होते.

यासंदर्भात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, आता न्यायालयाला ठरवावे लागेल की, पोलिसांचा युक्तिवाद काय आहे. पोलिसांनी म्हटले की, कोठडीची आवश्यकता आहे. न्यायालय त्यावर निर्णय घेईलच, पण पोलिसांनी मागणी केली नाही. तर ते न्यायदंडाधिकारी कोठडीत जातील. त्यानंतर नितेश राणे यांना जामीन द्यावा की नाही हे बघितले जाईल. पोलिसांना कोठडी मागण्यासाठी सबळ कारणे आहेत की नाही हे सिद्ध करावे लागेल. ते सिद्ध केले तरच ती दिली जाईल.

Exit mobile version