नीरव मोदी भारताच्या टप्प्यात

नीरव मोदी भारताच्या टप्प्यात

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फसवणूक आणि पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या जवळपास दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईत युकेच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय दिला आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नीरव मोदी हे दोषी आहेत असे सांगणारे पुरावे उपलब्ध आहेत.” ४९ वर्षीय नीरव मोदी हे वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले.

नीरव मोदी यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या जेलवरूनही नीरव मोदी यांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र आता या जेल संदर्भात असलेले सर्व आक्षेप न्यायालयाने फेटाळले आहेत. तेथे जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूझी यांनी, नीरव मोदींनी भारतीय न्यायालयासमोर हजर रहाणे बंधनकारक आहे का याविषयी निर्णय दिला आहे. या निकालाविरुद्ध नीरव मोदी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

शंतनू मुळूकला जामीन नाही

नीरव मोदी यांच्यावर दोन प्रकारचे गुन्हे आहेत. सीबीआयकडून नोंदवण्यात आलेल्या केसमध्ये बेकायदेशीर लेटर्स ऑफ अंडरस्टँडिंग तयार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा करण्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर सक्तवसूली संचालनालयातर्फे (ईडी) त्यांच्यावर मनी लॉन्ड्रींगची केस दाखल करण्यात आलेली आहे. नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेला चौदा हजार कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप आहे.

Exit mobile version