जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपी दहशतवाद्यांना राहायला घरे, अन्न आणि इतर रसद पुरवायचे

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Portrait, backlight, smoke, terror, Real time, Adult, Lifestyle, terrorism, danger, people, portrait, criminal, violence,

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून कुरापती सुरू आहेत. अशातच जम्मू- काश्मीरच्या तीन भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दहशतवादविरोधी कारवाया सुरू आहेत. जम्मूच्या किश्तवाड, उधमपूर आणि काश्मीर खोऱ्यातील अनंतनागच्या कोकरनाग भागात सुरक्षा दलांकडून कारवाया सुरू आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी कठुआ जिल्ह्यात नऊ दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. जून आणि जुलै महिन्यात जम्मूच्या कठुआ-बनिहाल-किश्तवाड भागात चार लष्करी जवानांच्या हत्येशी आणि अन्य हल्ल्यांशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

जम्मूच्या किश्तवाड आणि उधमपूरमध्ये रविवारी पहाटे दोन ठिकाणी चकमक सुरू झाली. घुसखोरांची ओळख पटवून कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले. घटनास्थळी मधूनमधून गोळीबार होत होता. २५ जुलैपासून किश्तवाड भागात सुरू असलेली वार्षिक मछेल यात्रा काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र, सुरक्षा दल परिसरात दाखल झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांचे संयुक्त पथक परिसरात शोध मोहीम राबवत आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, जून आणि जुलै महिन्यात जम्मूच्या कठुआ-बनिहाल- किश्तवाड भागात चार लष्करी जवानांच्या हत्येशी आणि अन्य हल्ल्यांशी संबंधित असलेल्या नऊ दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद लतीफ उर्फ हाजी लतीफ, अख्तर अली, सद्दाम, कुशल, नूरानी, मकबूल, सोफियान, लियाकत, कासीम दिन आणि खादीम उर्फ काझी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हे ही वाचा:

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसाची मागितली माफी!

भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

अटक करण्यात आलेला हाजी लतीफ हा त्या परिसरातून जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटांसाठी गाईड/लॉजिस्टिक अशी काम करत असे, अशी माहिती समोर आली आहे. या कामात त्याने इतर लोकांनाही सहभागी करून घेतले. हे आरोपी दहशतवाद्यांना राहायला घरे, अन्न आणि इतर रसद पुरवायचे. तसेच जंगल परिसरात दहशतवाद्यांना मार्ग दाखवण्यास मदतही करायचे. शिवाय आरोपींनी कबूल केले आहे की, त्यांनी गंडोह चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांना जंगल भागात जाऊन लपण्यासाठी मदत केली होती.

Exit mobile version