ओडिशामधल्या पुरी येथील सुप्रसिद्ध अशा जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्या प्रकरणी ओडिशा पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी नऊ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, काही गैर हिंदू बांगलादेशी पुरातन मंदिरात प्रवेश करत आहेत. तसेच मंदिर समितीच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ बांगलादेशी इसमांना ताब्यात घेतलं आहे.
मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून काही गैर हिंदू बांगलादेशी मंदिरात प्रवेश करत होते. त्यांना मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुशील मिश्रा यांनी सांगितल्यानुसार काही बांगलादेशी गैर-हिंदूंनी मंदिरात प्रवेश केल्याबाबतची तक्रार त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक मंदिराकडे रवाना झाले. या संशयास्पद इसमांना पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा:
विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!
नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!
मदिराच्या नियमांनुसार या मंदिरात केवळ हिंदू भाविक प्रवेश करू शकतात. ज्या बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे ते गैर हिंदू असतील तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या त्यांचे पासपोर्ट तपासले असता या नऊ जणांपैकी एक इसम हिंदू असल्याचे समोर आले आहेत तर, इतरांचे पासपोर्ट आणि इतर दस्तावेजांची तपासणी केली जात आहे. या नऊ जणांपैकी चार जणांनी मंदिरात प्रवेश केला होता. तर इतर पाचजण मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.