छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा

शोध मोहिमेदरम्यान सुरू झाली होती चकमक

छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाई दरम्यान, नऊ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. मंगळवार, ३ सप्टेंबर सकाळी १०.३० च्या सुमारास सुरक्षा जवान आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) कंपनी क्रमांक २ चे नक्षलवादी यांच्यात ही चकमक झाली. घटनास्थळावरून नऊ जणांचे मृतदेह, सेल्फ लोडिंग रायफल ३०३ सह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

छत्तीसगडमधील दंतेवाडा-विजापूर सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतल्याची गुप्त माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शोधमोहिम राबविण्‍यात आली. यावेळी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गेळीबार केला. चकमक सुरू असताना नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्‍यात सुरक्षा दलांनी यश मिळवले. बस्तरचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ही कारवाई अद्याप सुरू असून या परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत एकही सुरक्षा कर्मचारी जखमी झालेला नाही.

हे ही वाचा..

ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती

कोलकाता: हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याला ८ दिवसांची सीबीआय कोठडी !

वैयक्तिक मालमत्तेची माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखले

हरियाणात ‘आप’ने काँग्रेसकडे केली २० जागांची मागणी

गेल्या आठवड्यात, छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तीन गावकऱ्यांची वेगवेगळ्या घटनांमध्ये हत्या केली होती. यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हल्लीच छत्तीसगडला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सात राज्यांच्या पोलीस महासंचालकांशी नक्षलविरोधी धोरणांवर चर्चा केली होती.

Exit mobile version