राजधानी दिल्लीतील निकी यादव हत्याकांडप्रकरणात आता नवे आणि खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. दिल्लीचे विशेष आयुक्त रवींद्र यादव यांनि ही माहिती दिली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये निकी यादव आणि साहिल गेहलोत यांचा विवाह नोएडा येथील आर्य समाज मंदिरात झाला. पण साहिलचे कुटुंब या लग्नावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी निक्कीला आपल्या मार्गातून दूर करायचे ठरवले.
विशेष आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले की, साहिलने दहा तारखेला निकीची हत्या केली. आमच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही साहिलची चौकशी करून साहिलला अटक केली. साहिलच्या मित्राच्या ढाब्याच्या फ्रीजमधून आम्ही निकीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मग साहिलची विचारपूस सुरु केली.
आत्तापर्यंत आम्ही चौकशी केल्यावर पाच जणांचा सहभाग समोर आला आहे. साहिल, त्याचे वडील., साहिलचे दोन चुलत भाऊ आणि साहिलच्या दोन मित्रांना आम्ही अटक केली आहे. अटक केलेल्या पाच आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाच जणांमध्ये साहिलचा भाऊ नवीन सुद्धा आरोपी आहे. तो नवी दिल्ली येथे हवालदार असून द्वारका इथल्या सेवेत आहे.
हे ही वाचा:
हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती
तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात
सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?
महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?
विशेष आयुक्त रमेश यादव यांनी पुढे सांगितले की, एक ऑक्टोबर २०२० रोजी दोघांनी ग्रेटर नोएडा येथील आर्य समाज मंदिर मध्ये लग्न केले होते. तर साहिलची नऊ फेब्रुवारी २०२३ ला दुसऱ्या मुलीशी साखरपुडा झाला. त्याच रात्री साहिल निक्कीच्या फ्लॅटवर जातो आणि त्यानंतर तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने काश्मिरी गेट परिसरात तिला नेऊन तिची हत्या करतो.
दहा फेब्रुवारीला म्हणजेच मिरवणुकीच्या दिवशी साहिलच्या कुटुंबीयांनी शोध सुरु केला त्याच दरम्यान साहिलने त्याच्या भावांना आणि मित्रांना फोन करून सांगितले कि मिरवणुकीच्या दिवशी तिची हत्या करण्यात आली आहे. नंतर तिचा मृतदेह फ्रीझ मध्ये ठेवून त्याने आपला दुसरा विवाह अगदी थाटामाटात करून घेतला. साहिलच्या घरच्यांना लग्नाची माहिती होती घरी परतल्यानंतर साहिलने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.