ड्रग्स तस्करीत नायजेरियन करताहेत भारतीय महिलांचा वापर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केला पर्दाफाश

ड्रग्स तस्करीत नायजेरियन करताहेत भारतीय महिलांचा वापर

नायजेरियन ड्रग्स माफियाकडून भारतात बेकायदेशीर ड्रग्स तस्करीसाठी नवीन कार्यपद्धतीचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार एनसीबीने देशभरात केलेल्या कारवाईत समोर आला आहे. भारतीय महिलांशी लग्न करून त्यांचा ड्रग्सच्या धंद्यात वापर करण्याचा ही नवीन ड्रग्स तस्करीसाठी कार्यपद्धती नायजेरियन टोळीकडून वापरली जात असल्याचे समोर आले आहे.

एनसीबीने दिल्ली येथील एका महिलेला मुंबईतून ड्रग्ससह अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून या प्रकारे अनेक भारतीय महिला नायजेरीयन ड्रग्स माफियांच्या जाळ्यात अडकलेल्या असल्याची माहिती समोर येत आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने देशभरात ड्रग्स विरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत एनसीबीच्या विविध पथकाने दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, हरियाणा, कर्नाटक राज्यामध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईत भारतीय महिला पुरुषासह आफ्रिकन ड्रग्स माफियांना अटक करून ट्रान्स नॅशनल ड्रग सिंडिकेटचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे.

ट्रान्स सिंडिकेटचे मुख्य आरोपी असलेले नायजेरियन अंमली पदार्थ तस्करी करीत होते आणि दिल्लीतून अटक केलेली महिला ही दिल्लीतील सिंडिकेट चालवणाऱ्या मुख्य आरोपीपैकी एकाची पत्नी आहे. तीन मुलांची आई असलेल्या आपल्या पत्नीचा तो भारतात ड्रग्स वाहक म्हणून वापर करत होता, ती मुंबईतील ड्रग्ज दिल्लीतील त्याच्या निवासस्थाचे काम करायची आणि पुढे फक्त दिल्लीतील इतर मुख्य आरोपीपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत होती.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का लिहिले पत्र?

“मशाल’ अखेर उद्धव ठाकरेंच्याच हाती

भास्कर जाधवांच्या घरावर दगड, स्टम्प, बाटल्या फेकल्या

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

 

पुढे असेही समोर आले आहे की, हे सिंडिकेट सदस्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हर्च्युअल नंबर वापरत होते कारण ते एकमेकांना परिचित असल्याचे त्यांच्यातील संवादाचे माध्यम होते. एनसीबीच्या कारवाईत नवीन ट्रान्स-नॅशनल ड्रग सिंडिकेट आणि भारतात राहणाऱ्या मुख्य नायजेरियन ड्रग्स तस्करांची ओळख पटली आहे ज्यांनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे, त्यांची कुटुंबे आहेत आणि त्यांच्या व्हिसाच्या कालावधीपेक्षा जास्त वास्तव्य केले आहे.

या तस्करांशी विवाह केलेल्या भारतीय महिलांचा अंमली पदार्थांची तस्करी करणे, ड्रग्स पुरवठा करणे, ड्रग्सचा साठा करणे ड्रग्स तस्करांना आश्रय देण्यासाठी भारतीय महिलांच्या या प्रकारे नायजेरियन तस्कराकडून वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version