24 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरक्राईमनामालंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी

लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी

भारतीय दूतावासात झालेल्या निदर्शनानंतर परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले

Google News Follow

Related

लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थक आणि देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. २४ मार्च रोजी, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भारतीय दूतावासासमोर निदर्शने करणाऱ्या खलिस्तानी आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला.

खलिस्तानी समर्थकांविरुद्ध भारतीय दंड संहिता, यूएपीए आणि पीडीपीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लंडनमधील भारतीय दूतावासात झालेल्या निदर्शनानंतर परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले, त्यानंतर गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.आता हे प्रकरण एनआयएकडे गेले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन भारताचे नागरिक आहेत आणि परदेशात राहून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत. या आंदोलनाचे काही व्हिडिओ सुरक्षा यंत्रणांना मिळाले आहेत.

ही माहिती देताना एनआयएशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार तपास यंत्रणेने हे प्रकरण हाती घेतले आहे. एनआयएने अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर १९ मार्च रोजीनिदर्शने करताना तिरंग्याचा अपमान केल्याची घटना समोर आली होती. एनआयएशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्या निषेधामागे खलिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची संशयास्पद भूमिका आणि भारतीय तिरंग्याची विटंबना लक्षात घेऊन एनआयएला या प्रकरणाच्या चौकशीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या आंदोलनामागील कटाचा तपास एनआयएचे पथक करणार आहे.

काही खलिस्तान समर्थकांनी १९ मार्चला लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय राष्ट्रध्वज खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या. मात्र, भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत खलिस्तानींना विरोध करत खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून खलिस्तानी झेंडा फेकून दिला. या घटनेनंतर खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावर जप्त केले १६ कोटी रुपयांचे हेरॉईन

श्रीराम मंदिरासाठी १ कोटी देणारे महंत कनक बिहारी दासजी महाराज यांचे अपघाती निधन

दिलासा नाहीच मनीष सिसोदिया यांचा मुक्काम तुरुंगातच

बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड

लंडनमधील घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना बोलावून लंडनमधील घटनेवर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात ही घटना घडली तेव्हा सुरक्षा कर्मचारी तेथून पूर्णपणे अनुपस्थित होते. याबाबत ब्रिटिश उच्चायुक्तांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. सरकारने या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्रिटिश उच्चायुक्तांकडे केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा