पुणे हे दहशतवादाचे नवे हब बनत असल्याचे चित्र असून गेल्या काही दिवसांपासून काही दहशतवाद्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने पुण्यातील दहशतवादी कारवायांचा तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे (एनआयए) देण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला असून न्यायालयाने सर्व कागपत्रसांसह हे प्रकरण एनआयएकडे सोपविले आहे. सुरवातीला पुणे पोलिसांनी आणि त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने या गुन्ह्याचा तपास केला होता. त्यानंतर नव्याने गुन्हा दाखल करून तपास हस्तांतरित करण्याचा अर्ज एनआयएने विशेष न्यायालयात दाखल केला होता. याला हिरवा कांदाही मिळाला असून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग झाले आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात १८ जुलै रोजी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महम्मद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) यांना कोंढवा येथून कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. पुढे चौकशी दरम्यान हे दोघे दहशतवादी असल्याचे समोर आले होते. कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, मूळ रा. रत्नागिरी) यांना देखील अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या कथित ‘फ्लाइंग किस’विरोधात तक्रार
गाडी चोरली, रंग बदलला, पण हॉर्न बदलला नाही आणि घात झाला!
“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल
चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा
त्यानंतर एनआयएच्या पथकाने झुल्फिकार बडोदावाला याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य, प्रक्रिया अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयातून एनआयएने पाचही दहशतवाद्यांची एनआयए कोठडी घेतली असून त्यांना बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर एनआयए स्वतंत्र पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करणार आहे.