मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणे एनआयएकडे वर्ग

प्रभावी तपासासाठी घेतला निर्णय

मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणे एनआयएकडे वर्ग

मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने स्वीकारली आहेत. यात मणिपूरमध्ये झालेली जीवितहानी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेमधील अशांतता अशा प्रकरणांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानंतर एनआयएने ही प्रकरणे मणिपूर पोलिसांकडून ताब्यात घेतली कारण या प्रकरणांशी संबंधित हिंसक कारवायांमुळे मणिपूरमध्ये अलिकडच्या काही महिन्यांत मृत्यू आणि सामाजिक अशांततेच्या घटना वाढल्या होत्या.

मणिपूरमध्ये पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी राज्यात सीआरपीएफ जवान आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये १० दहशतवादी मारले गेले. ही घटना जिरीबाम जिल्ह्यात घडली, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अतिरेकी पोलिस चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. ताज्या हिंसाचारानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने काम सुरू केले आहे. सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. सहा जणांच्या अपहरणाचा एक वेगळा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. जिरीबाममधील सहा जणांचे अपहरण झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे मृतदेह सापडले होते. या घटनेबाबत एनआयएने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. वाढत्या अस्थिरतेला प्रतिसाद म्हणून, ही तीन प्रकरणे मणिपूर पोलिसांकडून एनआयएकडे हस्तांतरित केली आहेत.

प्रभावी तपासासाठी महत्त्वाची प्रकरणे एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील सुरक्षेची परिस्थिती नाजूक राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे कारण संघर्षात दोन्ही समुदायांचे सशस्त्र आंदोलक हिंसाचारात गुंतले आहेत ज्यामुळे जीवितहानी होत असून सार्वजनिक व्यवस्थेत व्यत्यय येत आहे.

हे ही वाचा : 

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’; ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू

अलीकडील हिंसाचारानंतर, सर्व सुरक्षा दलांना सुव्यवस्था आणि शांतता पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि जो कोणी हिंसक आणि विघटनकारी कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने लोकांना शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि मणिपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मणिपूरमधील अलीकडील सुरक्षा परिस्थितीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

Exit mobile version