पश्चिम बंगालच्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे २०२२ मध्ये एका कच्च्या घराच्या छतावर स्फोट झाला होता. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएकडून कारवाई सुरू आहे. याचं प्रकरणी शुक्रवार, २९ मार्च रोजी पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. टीएमसीच्या आठ नेत्यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय तपास एजन्सीने टीएमसीच्या आठ जणांना शनिवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी पूर्वीचे समन्स वगळले असून त्यात त्यांना २८ मार्च रोजी जवळील न्यू टाऊन येथील एनआयए कार्यालयात जाण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम बंगालच्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे ३ डिसेंबर २०२२ रोजी स्फोट झाला होता. कच्च्या घराच्या छतावर पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा:
केजरीवालांनंतर कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीकडून समन्स
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला
व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार
भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका
टीएमसी नेते कुणाल घोष यांनी आरोप केला आहे की, एनआयएच्या या कारवाईमागे भाजपाचा हात आहे. भाजपाने पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील टीएमसी नेत्यांची यादी केंद्रीय एजन्सीला दिली आहे आणि एनआयए शनिवारी त्यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक करण्याची योजना आखत आहे, असा दावा घोष यांनी केला आहे.