एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

फेब्रुवारी महिन्यात झाली होती दोघांची हत्या

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्क मोडून काढण्यासाठी सुरक्षा दलांकडून पावले उचलली जात आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन गैर-स्थानिकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपीची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. ‘एनआयए’ने बुधवारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF), लष्कर-ए-तोयबा (LeT) विंगशी संबंधित प्रमुख दहशतवादी संशयित आदिल मंझूर लंगू याची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. गुरुवारी याची माहिती समोर आली आहे.

या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर शहरातील रहिवासी अमृत पाल सिंग आणि रोहित मसीह या दोन बिगर स्थानिक मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये अमृत पाल सिंगचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मसीह याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे एका दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

श्रीनगरच्या जलदगरमध्ये असलेली मालमत्ता बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम २५ अंतर्गत जप्त करण्यात आली होती. हा खटला लंगूसह अन्य दोघांनी म्हणजेच अहरान रसूल दार आणि दाऊद यांनी रचलेल्या कटाशी संबंधित आहे. त्यांच्या पाकिस्तानात स्थित टीआरएफ आणि एलईटी हँडलरच्या नेतृत्वात, दहशतवाद पसरवण्याच्या आणि हिंसाचाराला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने भारतातील निरपराध लोकांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता.

हे ही वाचा : 

‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

राजस्थान: मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून राडा; ६० जणांना अटक

झारखंड निवडणूक; पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान!

जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!

७ फेब्रुवारी रोजी दोन गैर- स्थानिकांच्या हत्येनंतर तपासात लंगू, दार आणि दाऊदला अटक करण्यात आली, तर पाकिस्तानस्थित मास्टरमाइंड जहांगीर अजूनही फरार आहे. १२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या लंगूवर ऑगस्टमध्ये इतर आरोपींसह आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि त्याला श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच्यावर आयपीसी, यूएपीए आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली खटला सुरू आहे.

Exit mobile version