सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

 

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याशी संबंधित आणखीन एक गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहे. सचिन वाझेशी संबंधित ही आठवी गाडी आहे. शुक्रवारी संध्याकळी ही गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आणि आपल्या मुंबई येथील कार्यलयात आणली. ही पांढऱ्या रंगाची मर्सीडीज कंपनीची गाडी आहे. वाझेसी संबंधित या गाडीमुळे आता नवीन काय गोष्टी समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही परकरणांचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. या दोन्ही केसाशी संबंधित निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा सध्या मुख्य आरोपी म्हणून अटकेत आहे. वाझे ह्याच्यावर अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा आरोप आहे तर मनसुखच्या हत्येतही वाझेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या दोन्ही केसेसचा तपासात दिवसागणिक रोज नवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओपासून सुरु झालेल्या या तपासात आतापर्यंत आठ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

संजय राऊतांना समज द्या, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

उद्धव ठाकरे, पाल्हाळिक बोलणे बंद करा

शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे प्रकरणाशी संबंधित एक पांढऱ्या रंगाची मर्सीडीज गाडी ताब्यात घेतली. ही गाडी सध्या मुंबई येथील एनआयए कार्यालयाच्या आवारात आहे. मर्सीडीज एमएल २५० सीडीआय या मॉडेलची ही गाडी आहे. एमएच ४६ एक्स ३४२० असा या गाडीचा क्रमांक असून पनवेल आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी करण्यात आली आहे. गगनप्रीत सिंह बेदी या इसमाच्या नावे या गाडीची मालकी आहे. सचिन वाझे ही गाडी नेमकी कशासाठी वापरत होता? अंबानी स्फोटक प्रकरण किंवा मनसुख हत्या प्रकरणात या गाडीची काही भूमीका होती का? हे अजून स्पष्ट झाले नाहीये. त्यामुळे आता एनआयएच्या तपासात या पांढऱ्या गाडीशी संबंधित काय गोष्टी पुढे येतात यावरून वाझे प्रकरणाला कोणते नवे वळण मिळणार हे समजू शकेल.

Exit mobile version