फुलवारी शरीफ प्रकरणानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बिहारमधील अनेक ठिकाणी छापेमारी केल्यानंतर दोन एफआयआर दाखल केले आहेत. यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. ११ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमध्ये रॅली होती, त्यात गोंधळ माजविण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही छापेमारी केली.
एनआयएने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, पटना, दरभंगा, पूर्व चंपारण, नालंदा, मधुबनी येथील १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पीएफआयचा त्यात संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत काही डिजिटल वस्तू आणि कागदपत्रे हाती लागली आहेत.
२२ जुलैला एनआयएने गुन्हा दाखल केलेला आहे. बिहार पोलिसांनी १२ जुलैला यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यात दोनजणांना अटकही करण्यात आली होती. मोहम्मद जलालुद्दीन व अथर परवेझ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. १५ जुलैला तिसऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
National Investigation Agency (NIA) has filed two separate FIRs in Bihar's Phulwari Sharif terror module case. First FIR is registered against 26 suspects while another named one. pic.twitter.com/p0ctdwM6og
— ANI (@ANI) July 29, 2022
२२ जुलैला हे एफआयआर नोंदविण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे. यातील पहिल्या एफआयआरमध्ये २६ जणांची नावे आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत गोंधळ घालण्यात येणार होता. त्यासाठी ११ जुलैला काही संशयित एकत्र आले होते.
हे ही वाचा:
गोवंडीत आढळले एकाच कुटुंबातील चार मृतदेह
कोकणचा सुपुत्र भारताच्या सरन्यायाधीशपदी
अंधेरीत आग आणि धुराचे लोट; अग्निशमन दलाची शर्थ
दुसरा एफआयआर १४ जुलैला नोंदविण्यात आला आहे. त्यात मरगब अहमद दानिश याचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हा अहमद दानिश तथा ताहीर गझवा ए हिंद या संघटनेशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे.