इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (ISKP) प्रकरणात ISIS च्या विचारसरणीसाठी भारतात काम करणाऱ्या एका संशयिताच्या घरी काल एनआयए (NIA) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा टाकला आहे. पुण्यातील कोंढवा येथे राहणाऱ्या तल्हा खान व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य एनआयएने जप्त केले आहे.
काल ७ मार्चलाएनआयएने या प्रकरणातील तल्हा खान (३८ वर्षे) याचा मुलगा लियाकत खान याची पुण्यातील कोंढवा येथील घराची झडती घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतील ओखला विहार, जामिया नगर येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दिक खत्री आणि अब्दुर रहमान या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारधारा पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट किलिंग करणे याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काल संशयित तल्हा खान याच्या घरी घेतलेल्या झडतीत विविध गुन्हे दाखल केले आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम
…आणि काश्मीर फाइल्समुुळे काश्मिरी पंडितांना अश्रु अनावर
रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार
‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’
आयएसकेपी (ISKP) म्हणजे काय?
इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) ही इस्लामिक स्टेट संघटनेची (ISIS) एक प्रादेशिक शाखा आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात ही संघटना सक्रिय आहे. अफगाणिस्तानातील सर्व जिहादी कट्टरवादी संघटनांमध्ये ही संघटना सर्वाधिक धोकादायक आणि हिंसक मानली जाते. इराक आणि सीरियामध्ये जेव्हा इस्लामिक स्टेट संघटना आपल्या सर्वाधिक क्षमतेने कार्यरत होती, त्यावेळी ISKP ची स्थापना झाली. ISKP ही संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतून जिहादींची भरती करते.