कट्टरवादी संघटना ‘हिजबूत- तहरीर’संबंधी एनआयएकडून तामिळनाडूमध्ये छापेमारी

११ ठिकाणी टाकले छापे

कट्टरवादी संघटना ‘हिजबूत- तहरीर’संबंधी एनआयएकडून तामिळनाडूमध्ये छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने हिजबूत- तहरीर या कट्टरवादी संघटनेसंबंधी कारवाई केली आहे. भारताला इस्लामिक राजवट बनवण्याचा कट आखणाऱ्या हिजबूत- तहरीर संघटनेच्या विरोधात मोहीम एनआयएने सुरू केली आहे. एनआयएकडून तामिळनाडूमध्ये किमान ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या संघटनेवर जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी आहे.

चेन्नई सेंट्रल क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, रोयापेट्टा येथील पिता- पुत्र आणि त्यांच्या साथीदारांनी हिजबूत तहरीरमध्ये सामील होण्यासाठी लोकांचे ब्रेनवॉश केले होते. चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रँचने या तरुणांवर देशविरोधी कारवायांमध्ये ब्रेनवॉश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेने दहशतवादाशी संबंधित प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे. यापूर्वी अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचीही चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान माहिती मिळाल्यानंतर एनआयएने पुदुकोट्टई, कन्याकुमारी आणि तांबरमसह ११ ठिकाणी कारवाई केली.

हिजबूत- तहरीर ही संघटना उकसवणारी भाषणे करून तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांना जिहादसाठी तयार करण्यासोबतच त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही दिले जाते. कट्टरपंथी दहशतवादी संघटनाही जैविक शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण देतात. हिजबूत- तहरीर संघटनेचा धर्मांतर प्रकरणातही सहभाग आहे. याशिवाय लव्ह जिहादच्या घटनांमध्येही त्यांचा हात असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : 

आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी- झेलेन्स्की भेट; संघर्षाचे निराकरण करण्यावर भर

तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक

गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

मध्य प्रदेशात हिजबूत- तहरीर संबंधित १६ जणांना अटक करण्यात आली होती. यातील निम्मे असे होते जे धर्मांतरानंतर मुस्लिम झाले. इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे हे या कट्टरवादी संघटनेचे उद्दिष्ट आहे. त्यांची एक वेबसाइट देखील आहे ज्यामध्ये अल्लाहवर विश्वास न ठेवणारी व्यवस्था रद्द करावी लागेल असे म्हटले आहे. ही संघटना १९५२ मध्ये जेरुसलेममध्ये स्थापन झाली.

Exit mobile version