एनआयएने सहा राज्ये पिंजून काढली; दोघांना घेतलं ताब्यात

एनआयएने सहा राज्ये पिंजून काढली; दोघांना घेतलं ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज ISIS मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सहा राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेडमध्येही छापा टाकण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एनआयएने मोठी कारवाई करताना मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापेमारी केली. उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी केली आहे. सहा राज्यांमध्ये केलेल्या  या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रातील हुपरी येथे टाकलेल्या छाप्यात दोघा तरूणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले तरूण दोघे सख्खे भाऊ असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फाउंडेशनच्या माध्यमातून हुपरी रेंदाळ परिसरात कार्यरत आहे. तो एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

मॅकेनिकल इंजिनियरचा सहभाग देशविरोधी कारवायात असल्याचा संशय

एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

उद्योग वर्धिनी: प्रत्येक हाताला काम!

सीसीटीव्हीमुळे पकडले गेले दोन सराईत मोबाईल चोर

एनआयए च्या पथकाने आज पहाटे चारच्या सुमारास हुपरी- रेंदाळ दरम्यान असलेल्या अंबाबाई नगर मधील एका घरात छापा टाकला. यावेळी ३० ते ३५ वर्षाच्या दोघा भावांना ताब्यात घेतले आहे. या भावांची पथकाने तब्बल सात तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे.

Exit mobile version