राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडून राज्यात छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एनआयएने ISIS (इसिस) च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
इसिसच्या संपर्कात असलेल्या मुंबईतील नागपाडा येथील एका संशयित व्यक्तीविरुद्ध एनआयएने २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात आणखी काही जण इसिसच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एनआयएकडून पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे छापेमारी सुरू आहे.
एनआयएने मुंबईत दोन ठिकाणी, पडघ्यात दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. एनआयए कडून अद्याप हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनआयएकडून सुरू असलेली कारवाई नागपाडा पोलीस ठाण्याजवळ सुरू आहे, येथुन अटक केलेली व्यक्ती अनेक दिवसांपासून आहे. ही व्यक्ती इसिस च्या संपर्कात होता, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.
हे ही वाचा:
भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
अमित शहांची मध्यस्थी; दोन महिन्यांनंतर मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग मोकळा
आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे
राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल
पुण्यात एनआयए आणि आयबीची छापेमारी
पुण्यात एनआयए आणि आयबी (IB) ची छापेमारी सुरु आहे. या दोन्ही यंत्रणांच्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये एनआयए आणि आयबीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. जुबेर शेख (वय ३९) याला चौकशीसाठी एनआयए आणि आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतलं आहे.