28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाकाश्मीरमध्ये 'इसिस'वर राष्ट्रीय तपास यंत्रणेने घातले छापे

काश्मीरमध्ये ‘इसिस’वर राष्ट्रीय तपास यंत्रणेने घातले छापे

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी (१० ऑक्टोबर २०२१) जम्मू -काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे घातले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस) च्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली. श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यातील आठ ठिकाणांच्या छाप्यादरम्यान, तौहीद लतीफ, सुहेल अहमद आणि अफशान परवेझ यांना अटक करण्यात आली. मोबाइल फोन, टॅब्लेट, लॅपटॉप, हार्ड डिस्क इत्यादी डिजिटल उपकरणे आणि अनेक गुंतागुंतीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

“एनआयएला माहिती मिळाली होती की दहशतवादी संघटना इसिसने भारतात जिहादसाठी भारतातील मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचे आणि त्यांची भरती करण्याचे षडयंत्र रचले आहे. ही योजना राबवण्यासाठी सायबरस्पेसवर एक संघटित मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक दहशतवाद्यांना वित्तपुरवठादेखील याच माध्यमातून केला जात आहे.” असे एनआयएने म्हटले आहे.

“आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी भारतातील आयएसआयएस कॅडरसह विविध क्षेत्रातून कार्य करत, खोटी ऑनलाइन ओळख तयार करून, एक नेटवर्क तयार केले आहे, ज्यामध्ये आयएसआयएसशी संबंधित प्रचार साहित्य कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि आयएसआयएसच्या सदस्यांमध्ये भरती करण्यासाठी प्रसारित केले गेले आहे.”

हे ही वाचा:

‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे

एनआयएच्या म्हणण्यानुसार, अटक केलेले आरोपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान स्थित विदेशी आयएसआयएस कार्यकर्त्यांशी संबंधित होते. काश्मीरमधील अटक केलेल्या आरोपींचे काही इतर सहकारी आयएसआयएसच्या जमिनीवरील आणि ऑनलाइन कारवायांमध्ये सामील आहेत, ज्यात भारत केंद्रित आयएसआयएस प्रचार प्रसारित करणे आणि अनुवाद करणे ही कामं  त्यांच्या  ‘व्हॉइस ऑफ हिंद’ या मासिकाचा माध्यमातून केली जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा