‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

जम्मूमधील दोडा आणि भटिंडी या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. टेरर फंडींग संबंधित ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने सोमवार, ८ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मूमधील दोडा आणि भटिंडी या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. टेरर फंडींग संबंधित ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या ‘जमाते इस्लामी’ (Jel) या दहशतवादी संघटनेच्या संबंधित ठिकाणांवर एनआयएकडून जम्मू-काश्‍मीरमधील विविध ठिकाणांवर छापे घालण्यात आले. तसेच या संघटनेच्या म्होरक्यांच्या आणि सदस्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले.

दोडा जिल्ह्यातील मुन्शी मोहल्ला, धारा-गुंडाना, नागरी नई बस्ती, अक्रमबंद, खरोती भागवाह, थलेला आणि मालोथी भल्ला तर जम्मूमधील भटिंडी येथे छापे टाकण्यात आले आहेत. टेरर फंडींग संबंधित ही कारवाई असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जमाते इस्लामी संबंधित ५ फेब्रुवारी २०२१ रोजी एनआयए सुओ मोटोने हा खटला नोंदवला होता. त्यानुसार जमाते इस्लामी संबंधित लोक देणग्यांच्या माध्यमातून देशांतर्गत आणि परदेशात निधी गोळा करून कथित कल्याणकारी परंतु, हिंसक कामांसाठी पैसा देत असत.

हे ही वाचा:

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

धनखड कणखर हिंदुत्ववादी

टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग

पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

एनआयएच्या माहितीनुसार जमाते इस्लामीद्वारे उभारला जाणारा निधी हा लष्कर-ए-तोयबा, हिजबुल-मुजाहिद्दीन आणि इतर प्रतिबंधित दहशतवादी संघटनांसाठी वापरला जातो. फेब्रुवारी २०१९ मध्ये, केंद्राने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत जमाते इस्लामीवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्यामुळे आणि जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Exit mobile version