राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींच्या प्रकरणाच्या चालू तपासाचा भाग म्हणून छापेमारी केली. एनआयएने पाच राज्यांमध्ये १९ ठिकाणी शोध घेतला. जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर गुरुवार, १२ डिसेंबर रोजी पहाटेपासून छापे टाकण्याचे काम सुरू आहे.
एनआयएच्या या ऑपरेशनमध्ये दहशतवादी प्रचाराचा प्रसार आणि अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एनआयएने पाच राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेऊन शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी उर्फ अयुबी नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर दोन महिन्यांनी ही धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर राज्यात २६ ठिकाणी झडती घेतल्यानंतर आयुबीला ताब्यात घेण्यात आले होते. पुढे त्याने कट रचल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती.
कारवाईनंतर, इतर अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर छापेमारी दरम्यान, एनआयएच्या पथकांनी अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॅम्प्लेट्स आणि मासिके जप्त केली होती. अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये ज्या संशयितांच्या जागेची झडती घेण्यात आली त्यांच्याविरुद्ध पुरावे तपासल्यानंतर एनआयएला लीड मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी या नव्या ठिकाणांची झडती घेण्यात येत आहे.
हे ही वाचा :
मणिपूरमध्ये ‘प्रीपाक- प्रो’ प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक
जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी
चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली
कपूर कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला!
एनआयएने सांगितले की, संशयित जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींना कट्टरपंथी बनविण्यात गुंतले होते आणि दहशतवादी संबंधित प्रचार प्रसारित करण्यात आणि कट्टरपंथी बनविण्यात आणि जैश-ए-मोहम्मदने प्रेरित असलेल्या जमात संघटनेत तरुणांची भरती करण्यात गुंतले होते. तसेच हे संशयित तरुणांना भारतभर हिंसक दहशतवादी हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात गुंतले होते, असेही एनआयएने म्हटले आहे.