भारत विरोधी कारवायांमध्ये सामिल असण्याच्या संशयातून एनआयएने जम्मूएने प्रारंभ केला आहे. रविवारी पहाटेपासूनच या कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात या कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी १० जुलै रोजी एनआयएने जम्मू आणि काश्मिरमधून सहा लोकांना दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्या प्रकरणात अटक केली होती.
जम्मू आणि काश्मिरमध्ये अकरा सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते. या काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा देखील समावेश होता.
हे ही वाचा:
…म्हणून राहुल गांधींचे ट्विटर खाते झाले लॉक!
जेष्ठ संघ प्रचारकांचा सन्मान…टपाल खात्याने प्रकाशित केले टपाल तिकीट
दिल्ली न्यायालयाने देखील हिजबुल मुजाहिदीनशी संबंध असलेल्या चौघांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देखील दिले होते. प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे जम्मू आणि काश्मिरमध्ये घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानातून आर्थिक मदत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कोर्टाने गुन्हेगारी कटकारस्थान, युद्धखोरी अशा विविध आरोपांसह युएपीएच्या विविध कलमांखाली आरोप दाखल करण्याचा आदेश दिला होता. विशेष न्यायमुर्ती प्रविण सिंग यांनी त्यांच्या आदेशात असे देखील म्हटले होते की, दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांसाठी मदत मिळवण्यासाठी एका संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेचा उद्देश दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्याचा होता.