राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी छापेमारी केली आहे. माओवाद्यांशी संबंध असलेल्या ठिकाणांचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधील १२ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यास एनआयएने सुरुवात केली आहे.
एनआयएने मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळीच पश्चिम बंगालमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. कोलकातामध्येही छापेमारी सुरू असून नेताजी नगर, पाणिहाटी, बॅरकपूर, सोदेपूर, आसनसोल आणि पश्चिम बंगालमधील इतर अनेक ठिकाणी दोन महिला आणि त्यांच्या माओवाद्यांशी असलेल्या कथित संबंधासंदर्भात छापे टाकण्यात आले आहेत. या ठिकाणांहून काही महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
रशिद सिद्दिकी बनला शंकर शर्मा अन आयेशा बनली आशा; १० वर्षे भारतात होते वास्तव्याला
पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल
लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य घुसलं; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जमिनीवरून हल्ले करण्यास सुरुवात
धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!
संबंधित महिलांनी पूर्व भारतात माओवादी नेटवर्क पसरवण्यासाठी त्यांना पाठवलेला निधी पळवून नेल्याचा आरोप आहे. हे लोक माओवादी संघटनेत नेमकी कोणती भूमिका बजावत होते हे शोधण्यासाठी हे छापे टाकले जात आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.