26 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरक्राईमनामापीएफआय प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात धाडसत्र

पीएफआय प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात धाडसत्र

देशातील २५ ठिकाणी एनआयएची छापेमारी

Google News Follow

Related

पीएफआयच्या फुलवारी शरीफ प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहार, कर्नाटक आणि केरळमधील सुमारे २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकाने कटिहारच्या हसनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मुझफ्फर टोला येथे सुमारे ३ तास कारवाई केली. यावेळी एनआयएच्या पथकाने नासिर हुसैन यांच्या घरातील अनेक कागदपत्रांची झडती घेतली.

त्याचवेळी, स्थानिक लोकांच्या मते, एनआयएने मेहबूब आलम नदवीचा भाऊ मोहम्मद जावेद याला चौकशीसाठी सोबत घेतले आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जुलै २०२२ मध्ये, पीएफआयशी संबंधित काही लोक फुलवारीशरीफ, पाटणा येथे पोलिसांनी छाप्यात पकडले होते.

छाप्यात इंडिया २०४७ नावाचा ७ पानी दस्तावेजही सापडला आहे. यामध्ये येत्या २५ वर्षात भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना आखण्यात आली होती. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मुस्लिम तरुणांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी ६ जणांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

कार्यमुक्त करीत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, भाजपाबद्दलचे दुखणे अमेरिकेत सांगितले

कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक 

‘माझ्या पुतणीचा कुस्तीपटू आंदोलक गैरवापर करत आहेत’

पाटणा येथे १२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांना हल्ला करायचा होता, असे चौकशीत उघड झाले. त्यासाठी त्यांना १५ दिवस प्रशिक्षण देण्यात येत होते. पाटणा पोलिसांनी या संदर्भात यापूर्वी एफआयआर नोंदवला होता. नंतर हे प्रकरण एनआयएकडे गेले. तेव्हापासून एनआयए सातत्याने छापे टाकत आहे.या वर्षी ४ व ५ फेब्रुवारी रोजी एनआयएने बिहारमधील मोतिहारी येथेही ८ ठिकाणी छापे टाकले होते. दोन जणांना अटक करण्यात आली. खून करण्यासाठी ज्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची व्यवस्था केली होती. तन्वीर रझा उर्फ बरकती आणि मोहम्मद आबिद उर्फ आर्यन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा