24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामापीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

एनआयएच्या कारवाईत अनेक डिजिटल उपकरणे तसेच कागदपत्रे जप्त

Google News Follow

Related

भारताविरुद्ध दहशद पसरवण्याच्या पीएफआयच्या षडयंत्र प्रकरणात एनआयएकडून अनेक राज्यात छापे टाकत गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.भारतविरोधी भूमिका घेणारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या एजंटच्या कारवायांना हाणून पाडण्यासाठी ५ राज्यांमध्ये १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)करत असते.यांच्या विरोधात प्रत्येक वेळी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कार्यरत असते.पीएफआयच्या एजंटवर नजर ठेवून त्यांचे भारताविरोधी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी एनआयएने रविवारी पाच राज्यांमध्ये छापे टाकून गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यातील कन्नूर, मलप्पुरम, दक्षिण कन्नड, नाशिक, कोल्हापूर, मुर्शिदाबाद आणि कटिहार जिल्ह्यांतील एकूण १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.भारतातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या प्रतिबंधित संघटनेचचा कट होता.एनआयएने केलेल्या कारवाईत अनेक डिजिटल उपकरणे तसेच कागदपत्रे जप्त करण्यात आली.

हे ही वाचा:

भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

दादर मध्ये साखळी बॉम्ब स्फोटाची धमकी

आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी

२२ महिला पोलीस अधिकार्‍यांसह १४० पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर

दहशतवादी, हिंसाचार आणि तोडफोडीचे कृत्य, तसेच २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक खिलाफत स्थापन करण्यासाठी सशस्त्र केडर तयार करणे ,PFI आर्मी तयार करण्याचा प्रयत्न पीएफआय करत असते, त्यांच्या नेतृत्वाच्या प्रयत्नांचा उलगडा करत ते हाणून पाडण्यासाठी भारतीय यंत्रणा NIA कार्यरत असते.
NIA च्या तपासांनुसार,PFI भारतविरोधी हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी भोळ्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि त्यांना शस्त्रे प्रशिक्षण देण्याचा कट रचत असल्याचे तपासत आढळून आले.NIA ला संशय आहे की अनेक मध्यम-पंथी PFI एजंट मास्टर ट्रेनर म्हणून काम करत आहेत.

हे एजंट मास्टर देशाच्या विविध राज्यांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत PFI केडरना शस्त्रे, लोखंडी रॉड, तलवारी आणि चाकू वापरण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. गुप्तचर आणि तपासात्मक विश्लेषण आणि अंतर्दृष्टीच्या आधारावर, या कॅडर आणि कार्यकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

या अगोदर NIA ने एप्रिल २०२२ मध्ये दिल्ली द्वारे PFI विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.ज्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये देशव्यापी ऑपरेशननंतर डझनभर NEC सदस्यांसह अनेक PFI नेत्यांना अटक करत एजन्सीद्वारे पुरावे गोळा करण्यात आले.एनआयएने आरोपींविरुद्ध सखोल तपास केला आणि मार्च २०२३ मध्ये त्यापैकी १९ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.या आरोपपत्रात पीएफआय संघटनेचेही नाव होते.त्यानंतर, एप्रिल २०२३ मध्ये, शस्त्रास्त्र प्रशिक्षणाच्या PFI राष्ट्रीय समन्वयकाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.देशात गोंधळ निर्माण करण्यासाठी संवेदनाक्षम सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षित करण्याचा PFIचा कट उघड करण्यासाठी तपास चालू आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून एक शतक पूर्ण होईपर्यंत इस्लामिक राज्य निर्माण करणे हा या कटाचा अंतिम उद्देश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा