सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची शनिवारी एनआयए कडून चौकशी करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. शनिवारी सचिन वाझे पेडर रोड येथील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. सुरवातीचा आठवडा या प्रकरणात सचिन वाझे हे तपास अधिकारी म्हणून काम करत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी फडणवीस यांनी वाझेंबद्दल संशय व्यक्त केला होता. “जिलेटीनने भरलेल्या गाडीची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे तिथे पोहोचलेले होते. हिजबुल मुजाहुद्दीनच्या धमकीचे खोटे पत्रही वाझेंनाच सापडले होते. स्कॉप्रिओचे मालक असलेले मनसुख हिरेन हे वाझे यांच्या आधीपासूनच संपर्कात होते.” असा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला आणि त्याबाबतचे पुरावे देखील दिले.

हे ही वाचा:

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात

युएनमध्ये भारताची चकली डिप्लोमसी

शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये

वाझे यांची एनआयए कडून चौकशी झाल्यावर त्यातून नेमके काय समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान सचिन वाझे हे एनआयए कार्यालयात दाखल होण्याआधी त्यांनी व्हॉट्सऍपला ठेवलेल्या स्टेटसमुळे चर्चेत आले. शनिवारी वाझे यांनी व्हॉट्सऍप स्टेटस ठेवत ‘जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ आली आहे’ असे म्हटले होते.

वाझेंनी स्टेटसमध्ये काय म्हटले आहे?
“३ मार्च २००४ ला माझ्या सीआयडी मधील सहकाऱ्यांनीच मला एका खोट्या केसमध्ये अटक केली. आजही ती अटक अनिश्चित आहे. हाच इतिहास पुन्हा घडणार असे वाटत आहे. माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवू पाहत आहेत. आजच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. तेव्हा माझ्याकडे आशेची, संयमाची, आयुष्याची आणि नोकरीची १७ वर्ष होती. पण आज माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना नोकरीची आहेत, ना जगण्याच्या संयमाची आहेत. मला असे वाटते की जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे.”

Exit mobile version