26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामासचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मांची चौकशी

सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मांची चौकशी

Google News Follow

Related

सचिन वाझे प्रकरणात आता प्रदीप शर्मा यांची चौकशी होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कडून ही चौकशी केली जात आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणारे शर्मा आणि सचिन वाझे हे एकेकाळचे पोलीस दलातील सहकारी होते. वाझेप्रमाणेच शर्मा यांचाही शिवसेनेशी संबंध राहिला आहे. प्रदीप शर्मा यांनी २०१९ साली शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

एनआयएकडून सचिन वाझेची अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कसून चौकशी चालू आहे. बुधवारी याच संबंधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चार तास चौकशी झाली तर त्यानंतर प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी चौकशीसाठी मुंबई मधील एनआयएच्या कार्यालयात हजर झाले.

हे ही वाचा:

परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले

लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले

सचिन वाझे याची कोरोना काळात पोलीस दलात झालेल्या वापसी संदर्भात मुंबई पोलीसांचा एक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली. या अहवालानुसार पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांचा विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी सचिन वाझेची नियुक्ती केली होती. असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच परमबीर सिंह यांच्यामुळेच हाय प्रोफाईल केसेस वाझेकडे आल्या असे देखील सांगण्यात आले. मंत्र्यांच्या ब्रीफींगवेळीही वाझे उपस्थित असायचा असा ठपकही या अहवालातून ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे साधे एपीआय असूनही उच्च पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली आणि इतकेच नव्हे तर सचिन वाझे थेट आयुक्तांना रिपोर्ट करत होते असा देखील ठपका परमबीर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तर वाझे यांच्या सीडीआर अर्थात कॉल रेकॉर्डस् मधून प्रदीप शर्मा यांचे नाव एनआयएच्या रडारवर आल्याची माहिती मिळत आहे. शर्मा यांच्या चौकशीतून आता वझे प्रकरणात आणखीन काय गोष्टी समोर येतात यावर सगळ्यांच्या नजरा आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा