पुणे आयएसआय मॉड्युल प्रकरणात एनआयए ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा गावाला दशतवाद्यांनी सीरियाची उपमा दिली आहे.
पडघा हे गाव कट्टरपंथीयासाठी एक मुक्त क्षेत्र आहे जेथे शरियाचे पालन केले जाते, कोरोना या महामारीच्या काळातही येथील मशिदी खुल्या होत्या आणि हे गाव अल-शाम (ग्रेटर सीरिया प्रदेश) सारखे होते असे एका साक्षीदाराने एनआयआयच्या जबाबात म्हटले असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणाचा तपास हाती घेतलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) असा दावा केला आहे की पडघा गावातील रहिवासी झुल्फिकार अली बडोदावाला आणि पुण्यातील रहिवासी झुबेर शेख यांनी २०१५ मध्ये तरुणांना कट्टरपंथी बनवण्यास सुरुवात केली होती आणि व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार केला होता. त्यांनी इसिसच्या समर्थनार्थ संदेश पोस्ट केले.
एनआयएच्या आरोपपत्रात एका साक्षीदाराचे म्हणणे आहे, २०११-१२ मध्ये दुसर्या एका प्रकरणात अटक केलेल्या शेखच्या संपर्कात तो होता असा दावा केला होता. साक्षीदाराने असाही दावा केला की २०१४ मध्ये शेखने त्याला ‘युनिटी इन मुस्लिम उम्मा’ आणि ‘उम्मा न्यूज’ नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जोडले होते.
शेख पॅलेस्टाईन, सीरिया आणि इसिसच्या विचारसरणीशी संबंधित लेख पोस्ट करीत होता, असा दावा साक्षीदाराने केला आहे. त्याने दावा केला की, झुबेर व्यतिरिक्त एक तल्हा खान, अब्दुल्ला शेख (वॉन्टेड आरोपी जो ओमानमध्ये असल्याचे सांगितले जाते), बडोदावाला, अब्दुल कादीर, सिमाब काझी हे त्या व्हॉट्सऍप ग्रुपचे सदस्य होते ज्यांनी इसिसला पाठिंबा दिला आणि दहशतवादी गटाच्या विचारसरणीचा प्रचार केला. साक्षीदाराने दावा केला की, त्याने गट सोडला होता परंतु २०१७ मध्ये पुन्हा जोडला गेला.
साक्षीदाराने दावा केला की तो बडोदावालाच्या जवळचा होता आणि तो २०२२ मध्ये पुण्याबाहेर भिवंडी तालुक्यातील पडघा गावात गेला. साक्षीदाराने त्याला कारण विचारले असता, बडोदावालाने त्याला सांगितले की पडघा हा एक मुक्त क्षेत्र आहे जेथे शरियाचे पालन केले जाते. कोरोना या महामारीच्या काळातही मशिदी खुल्या होत्या आणि गाव अल-शाम (ग्रेटर सीरिया प्रदेश) सारखे होते.
आणखी एका साक्षीदाराने, ज्याची ओळख लपवली गेली आहे, त्याने सांगितले की तो शेखला २०१५ मध्ये भेटला होता. त्याने सांगितले की शेख रस्त्यावर बंदी घातलेला इस्लामिक विद्वान अन्वर अवलाकी यांचे ऑडिओ व्याख्याने शेअर करायचा. त्यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी शेखने दुसऱ्या साक्षीदाराला व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड केले.
एनआयए ने दुसर्या संरक्षित साक्षीदाराचे बाब जोडले आहे ज्याला शेखने गटात जोडले होते. २०१५-१६ मध्ये शेखला भेटल्याचा दावा या साक्षीदाराने केला होता. त्यांनी दावा केला की, साथीच्या रोगाच्या लॉकडाऊननंतर ते जंगलात फिरायला आणि पिकनिकला जायचे. नंतर, त्यांनी दावा केला की हळूहळू सदस्य इसिस विचारसरणीचा प्रचार करण्याबद्दल बोलू लागले. त्यामुळे तो त्यांच्यापासून दुरावला. एएनआयने असा दावा केला आहे की बडोदावाला खूप पूर्वी कट्टरपंथी बनला होता आणि त्याने शेखसोबत आणखी लोकांची भरती करण्याचा विचार करत होता.
एनआयएने दावा केला की बडोदावाला याने शमिल नाचन आणि अकीफ नाचन यांच्याशी अनेक बैठका केल्या आहेत, जे रतलाम मॉड्यूलचा भाग असलेल्या इम्रान खान आणि युनूस साकी या दोन आरोपींशी संबंधित होते.
आरोपीने रायफल चालविण्याचे प्रशिक्षण दिले असा ही दावा करण्यात आला आहे की, आरोपींना बॉम्ब बनवण्याचे आणि शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते, ज्याचे अहवाल इम्रान, साकी आणि अलीकडेच अटक करण्यात आलेले आरोपी शाहनवाज आलम यांनी परदेशी हँडलर्सना दिले होते.
हे ही वाचा:
बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!
घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!
निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामस्थळी स्मॉग स्प्रिंकलर बसवा!
आरोपींनी महाराष्ट्र आणि जवळपासच्या भागात अनेक ठिकाणी रेकी केली आणि दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती, असे एनआयएने म्हटले आहे. त्यांच्याकडे स्फोटक सामग्रीची सांकेतिक नावेही होती. उदाहरणार्थ, एसीटोनला गुलाबपाणी असे संबोधले जाते तर हायड्रोजन पेरोक्साइडला शरबत असे संबोधले जाते.