एनआयएकडून दहशतवाद्यांविरूद्ध चार्जशीट दाखल

एनआयएकडून दहशतवाद्यांविरूद्ध चार्जशीट दाखल

राष्ट्रीय अन्वेषण संस्थेेने (एनआयए) माध्यमांत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार कट्टर जिहादवादी संघटनांत सहभागी असलेल्या काही लोकांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. या बाबत एएनआयने ट्वीट देखील केले आहे.

हे ही वाचा:

बंगळुरू दंगलींमध्ये पीएफआयचा हात उघड

या पत्रकात म्हटल्यानुसार चार्चशीट दाखल केलेल्यांचे थेट लष्कर-ए-तायब (एलईटी) आणि हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनांशी संबंध होते.

एनआयएने आणखी दोन अतिरिक्त चार्जशीट दाखल केल्या आहेत. बंगळूरू स्थित डॉ. सबिल अहमद (मोटू डॉक्टर) आणि हैदराबाद येथील असदल्लुाह खान (अबू सुफियान) यांच्या विरोधातील या चार्जशीट असून ते दोघेही लष्कर-ए-तायबाशी निगडीत आहेत.

यापूर्वी एएनआयने एकाच खटल्यासाठी १७ लोकांवर चार्जशीट दाखल केली होती. २०१६ मधील एका खटल्याच्या संदर्भात १३ लोकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या व्यक्तींवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या व्यक्तींनी हिंदू धर्मातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी अवैध मार्गाने शस्त्रे खरेदी केली होती. कर्नाटकातील बंगळूरू आणि हुगळी, महाराष्ट्रातील नांदेड, तेलंगणामधील हैदराबाद याठिकाणी सामाजिक शांततेचा भंग करण्याच्या हेतूने या हत्या करण्यात येणार होत्या. यांच्यासोबत याच खटल्याच्या संदर्भात आणखी सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Exit mobile version