27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामापुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात सात आरोपींविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र दाखल

पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात सात आरोपींविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र दाखल

दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याचाही आरोप

Google News Follow

Related

पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याच्या कटात सहभागी असलेल्या इसिसच्या सात सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात यूएपीए कायद्यासह विविध कलमांतर्गत मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप होता. त्यांनी दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, त्यांना आश्रय देणे, तसेच आईडीची निर्मिती करण्याचाही आरोप ठेवण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासासाठी ६९ दिवसांची मुदतवाढ देण्याची एनआयएची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे.

अटक केलेल्या आरोपींनी भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याच्या हेतूने इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढविण्याचा कट आखला होता. त्यांच्या अटकेमुळे इसिसचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहशतवादी हल्ले करण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये रेकी केली होती. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविण्यासह नेमके कुठे स्फोट घडवता येतील, याची चाचपणी देखील रेकी दरम्यान त्यांनी केली होती. तसेच स्फोट झाल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सविस्तर योजना आखलेली होती. त्यानुसार त्यांनी दुर्गम भागातील घनदाट जंगलांतील संभाव्य ठिकाणेही निश्चित केली होती. ही ठिकाणी शोधण्यासाठी ड्रोनचाही वापर केला होता.

हे ही वाचा:

‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

आरोपपत्रात असलेली नावे?

  • मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश)
  • मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (रा. रतलाम, मध्य प्रदेश)
  • कदीर दस्तगीर पठाण (रा. कोंढवा, पुणे)
  • सीमाब नसीरुद्दीन काझी (रा. कोंढवा, पुणे)
  • जुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे)
  • शमील साकीब नाचन (रा. पडघा, ठाणे)
  • आकीफ अतीक नाचन (रा. पडघा, ठाणे)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा