वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या विशेष सत्र न्यायालयात वाझे यांना हजर करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून वाझे यांच्या रिमांडची मागणी केली गेली असल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
सचिन वाझे सोबत काही सौदा ठरला होता का? – आमदार अतुल भातखळकर
अर्णबला अटक करताना वाझेंनी वापरली होती ‘तीच’ स्कॉर्पिओ
‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन
वाझे प्रकरणातील ते शिवसेना नेते कोण?
शनिवारी अटक झाल्यानंतर रविवारी दुपारी वाझेंना विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याआधी वाझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या ‘हॉलिडे कोर्ट’ मध्ये न्यायमूर्ती शिंकरे यांच्या न्यायालयात वाझे यांना हजर करण्यात आले. यावेळी एनआयए कडून वाझे यांच्या १४ दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे.