एनआयएकडून सचिन वाझेची अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कसून चौकशी चालू आहे. सचिन वाझे यांची एनआयए कोठडी ९ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सचिन वाझेना यापूर्वी ७ एप्रिल पर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती. त्यात वाढ करून ती ९ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेची चौकशी करण्याची सीबीआयला देखील परवानगी देण्यात आली. त्यासाठी सीबीआयला एनआयएसोबत ताळमेळ साधण्याचे आदेश देण्यात आले.
हे ही वाचा:
…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस
सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मांची चौकशी
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘इथे’ फडकला तिरंगा
एनआयएने आत्तापर्यंत तपासात मोठी मजल मारली आहे. विविध ठिकाणाहून आठ महागड्या गाड्या, एक बाईक जप्त केली आहे. त्याबरोबरच मिठी नदीतून कंप्युटर, लॅपटॉप, हार्डडिस्क इ. साहित्यदेखील जप्त करण्यात आलं. त्याबरोबरच सचिन वाझेने प्रकृती ठिक नसल्याचं कारण देखील पुढे करून पाहिलं होतं. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याचा दावा देखील केला गेला.
त्याबरोबरच एनआयएने विविध ठिकाणी गुन्ह्याचे नाट्यरुपांतर देखील केले होते. त्यात अँटिलिया समोर वाझेला चालायला लावण्यापासून ते त्याच्यासोबत नुकताच सीएसएमटी ते कळवा केलेल्या रेल्वे प्रवासाचा देखील समावेश आहे.
बुधवारी अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या प्रकरणाच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या संबंधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चार तास चौकशी झाली तर त्यानंतर प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी चौकशीसाठी मुंबई मधील एनआयएच्या कार्यालयात हजर झाले.