टेरर फंडिंग केसमध्ये यासिन मलिक दोषी

टेरर फंडिंग केसमध्ये यासिन मलिक दोषी

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग केसमध्ये दोषी आढळला आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने मलिकला दोषी जाहीर केले आहे. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्टच्या अंतर्गत यासिन मलिक हा दोषी आढळला आहे. तर यासोबतच त्याच्यावर भारतीय दंड संहितेचे गुन्ह्याचा कट रचणे आणि राजगृहाचे गुन्हे देखील दाखल होते त्यातही तो दोषी आढळला आहे.

हुरियतचा म्होरक्या यासिन मलिक याच्या विरोधात दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी आवश्यक ती आर्थिक रसद पुरवणे यासंदर्भातील केस सुरू होती. या केसमध्ये यासीन मलिकने आपल्यावर दाखल असलेले सर्व गुन्हे कबुल केल्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी

‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’

पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

यासंदर्भात आता मलिक याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन त्या बाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे. तर मलिकच्या आर्थिक परिस्थिती संदर्भातील अहवाल सबमिट करण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला दिले आहेत. एनआयए कोर्टातील विशेष न्यायमूर्ती प्रवीण सिंह यांनी यासंदर्भात निकाल दिला आहे. त्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करून त्यानुसार दंड ठोठावण्यात येणार आहे. या संबंधीचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

कोर्टाने असे नमूद केले आहे की मलिकने जगभरातून निधी जमा करण्याची यंत्रणा उभी केली होती. या जमा झालेल्या निधीतून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यात आल्या. तर राज्यात आंदोलनांच्या माध्यमातून हिंसाचार पसरवण्याच्या कारवाईतही त्याचा सक्रिय सहभाग होता.

Exit mobile version