भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त

भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेने इंडो-श्रीलंकन ​​बेकायदेशीर ड्रग्ज आणि हवाला प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. चेन्नईच्या राष्ट्रीय तपास संस्थेने मोट्या प्रमाणावर रोकड, सोने, ड्रग्ज इत्यादी जप्त केले आहेत. याआधी गुरुवारी देखील तपास संस्थेने छापे मारले होते. या प्रकरणी आता एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने चेन्नईतील ८ संशयितांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेवर छापे टाकून आणि झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्याचे बार, डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, मेमरी कार्ड्स), औषधे आणि कागदपत्रे जप्त केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने जुलै २०२२ मध्ये या रॅकेटचा तपास सुरू केला होता . या प्रकरणी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये १३ जणांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

श्रीलंकेतील अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापारातून मिळणारी रक्कम हवाला एजंटच्या माध्यमातून भारतात आल्याचे या प्रकरणाच्या तपासात उघड झाले आहे. यामध्ये चेन्नईच्या शाहिद अलीचाही सहभाग होता. ड्रग्ज आणि शस्त्रांचा व्यापार चेन्नईतून होत होता. हा व्यवहार हवालाद्वारे झाला.या हवाला प्रकरणात चेन्नईतील काही हॉटेल्समध्ये व्यवहार करण्यात आल्याचे आढळून आले.

हे ही वाचा:

कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

७१ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्या

नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात

शाहिद अलीच्या दुकानातून ६८ लाखांचे भारतीय चलन आणि १,००० सिंगापूर डॉलर, ९ सोन्याची बिस्किटे (एकूण ३०० ग्रॅम) जप्त करण्यात आली आहेत. चेन्नईतील हॉटेल ऑरेंज पॅलेसमधून तपास संस्थेनेने भारतीय चलनात १२ लाख रुपये जप्त केले आहेत. शोध घेतल्यानंतर अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव अय्यप्पन नंदू असे आहे. तो श्रीलंकेचा निर्वासित आणि अंमली पदार्थ तस्कर मुहम्मद अस्मिनच्या वतीने ड्रग कार्टेल हाताळत होता.

Exit mobile version