26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाएनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

खलिस्तान समर्थकासह ६ जणांना अटक

Google News Follow

Related

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने ८ राज्यात जावंतास ७६ ठिकाणी छापे मारलेले आहेत. या छाप्यात एका दहशतवाद्याच्या जवळच्या साथीदारासह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी गट, अंमली पदार्थ तस्करी यात गुंतलेल्या विविध माफिया यांच्यातील संगनमताशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक केलेल्यांचा संबंध असल्याचे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

यया आधी एनआयएने मंगळवारी आठ राज्यांतील ७६ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लकी खोखर उर्फ ​​डेनिस हा कॅनडामध्ये राहणारा ‘घोषित दहशतवादी’ अर्शदीप सिंग उर्फ ​​अर्श डल्लाचा जवळचा सहकारी आहे.पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र), महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एनआयएने छापे मारले आहेत. या छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार या गुंडांच्या साथीदारांचा समावेश आहे.

पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असलेल्या खोखरला मंगळवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथून अटक करण्यात आली, असे एजन्सीने म्हटले आहे. खोखर हा अर्श डल्लाच्या थेट आणि सतत संपर्कात होता आणि त्याच्यासाठी भरती करत असे आणि तो दहशतवादी कारवायांमध्येही सामील होता. त्याने पंजाबमधील अर्श डल्लाच्या साथीदारांना शस्त्रे आणि दारूगोळा देखील पुरवला होता, ज्याचा वापर कॅनडास्थित दहशतवाद्याच्या सूचनेनुसार जगरांवमध्ये अलीकडेच खून करण्यासाठी केला गेला होता, एनआयएने सांगितले.

हे ही वाचा:

अबब !! आदिवासी महिलांनी साकारले जगातले सर्वात मोठे चित्र

दिल्ली महापालिकेत स्थायी समितीत नगरसेवकांनी बाटल्या फेकल्या, ठोसे लगावले

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांना विमानातूनच उतरवले

एनआयएने गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा, लखबीर सिंग संधू उर्फ ​​लंडा आणि अर्श डल्ला यांच्यासह सात जणांविरुद्ध स्वत:हून गुन्हा दाखल केला होता. एनआयएने या प्रकरणी यापूर्वी दीपक रंगा नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या गुन्ह्यांची प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत.छोटू राम भटचा साथीदार आणि या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला “कुख्यात गुन्हेगार” लखवीर सिंगकडून नऊ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत असे एनआयएने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा