लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त

लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त

भारत -श्रीलंका ​​बेकायदेशीर ड्रग्ज आणि हवाला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए ) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने, ड्रग्ज इत्यादी जप्त केले आहेत. या प्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. लिट्टे ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय करण्यासाठी शस्त्रे गोळा करण्याचा कट रचला जात असल्याची शंका एनआयने व्यक्त केली आहे.

एनआयएने सोमवारी चेन्नईतील आठ संशयितांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेवर छापे टाकले आणि झडती घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्याचे सळे, डिजिटल उपकरणे, ड्रग्ज आणि कागदपत्रे यासह इतर गुन्हे करणारे साहित्य जप्त करण्यात आले. एनआयएने मागील वर्षी जुलै महिन्यांत या रॅकेटचा तपास सुरू केला. त्यानंतर डिसेंबरमध्ये १३ जणांना अटक करण्यात आली होती. जुलै २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते . श्रीलंकेतील ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापारातून मिळणारी रक्कम हवाला एजंटच्या माध्यमातून भारतात आल्याचे या तपासात उघड झाले आहे. ड्रग्ज आणि शस्त्रांचा व्यापार चेन्नईतून होत होता.

हे ही वाचा:

मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय

…तर अजित पवारांची गणना अंधभक्तांत होईल!

आल्प्स पर्वतरांगांमध्ये हिमस्खलनात चार जणांचा मृत्यू, अडकलेले बहुतांश गिर्यारोहक

हिंदुत्वाची ऍलर्जी असणाऱ्यांची दुकाने बंद होतील!

काहीच दिवसांपूर्वी एनआयएने चेन्नईत टाकलेल्या छाप्यात शाहीद अलीच्या दुकानातून ६८ लाखांचे भारतीय चलन आणि १,००० सिंगापूर डॉलर्स, ९ सोन्याची बिस्किट) जप्त करण्यात आली होती . एनआयएने चेन्नईतील हॉटेल ऑरेंज पॅलेसमधून भारतीय चलनात १२ लाख रुपये जप्त केले होते. झडतीनंतर अटक करण्यात आलेला अय्यप्पन नंदू अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मुहम्मद अस्मिनच्या वतीने अमली पदार्थांचा व्यापार सांभाळत होता. हे सर्व लोक मिळून एलटीटीई या दहशतवादी संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याचा कट रचत असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.

Exit mobile version