रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात

संशयिताची चौकशी सुरू

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात

बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका प्रमुख संशयिताला राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने ताब्यात घेतले आहे. शब्बीर असे या संशयिताचे नाव असून त्याला कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सध्या या संशयिताची चौकशी सुरू आहे.

बंगळूरू येथील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट होऊन दहा जण जखमी झाले होते. टायमरचा वापर करून आयईडी बॉम्बचा स्फोट करून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. संशयिताला त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीवरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) एक सक्रीय सदस्य या बॉम्बस्फोटाच्या कटाचा सूत्रधार आहे, असा संशय एनआयएला आहे. तसेच संशयिताचे दहशतवादी संघटनांशी जवळचे संबंध असून पीएफआयने अनेक लोकांचे ब्रेनवॉश केले आहे. त्यामध्ये आरोपीचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

‘मिसाइल राणी’; अग्नि-५ क्षेपणास्त्रामागील डीआरडीओची ताकद!

देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

एनआयएने काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयिताचे फोटो समोर आणले होते. आरोपीला शोधून देण्याचे आवाहन यंत्रणेकडून लोकांना करण्यात आले होते. शिवाय आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षीसाची देखील घोषणा करण्यात आली होती. कॅफेच्या सीसीटीव्हीमध्ये ही व्यक्ती दिसली होती. मात्र, नंतर इतर ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये या व्यक्तीने कपडे बदलल्याचे कळून आले होते.

Exit mobile version