अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी रेटत होता आयसीसचा अजेंडा

फैजान विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघटनेचा प्रचार, प्रसार करण्यात गुंतला होता

अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी रेटत होता आयसीसचा अजेंडा

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोशल मीडियाद्वारे आयआयएसचा अजेंडा रेटण्यात गुंतलेल्या एका दहशतवादी कार्यकर्त्याला अटक केली आहे. देशात कार्यरत असलेल्या आयएसआयएसच्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवत, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका १९ वर्षीय दहशतवाद्याला अटक केली.

 

 

हा तरुण उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा (एएमयू) विद्यार्थीही आहे. त्याचे नाव फैजान अन्सारी असे आहे. तपास यंत्रणेने त्याच्या दोन वेगवेगळ्या राज्यांतील घराची आणि भाड्याने घेतलेल्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. १६ आणि १७ जुलै रोजी झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील घराची आणि उत्तर प्रदेशातील अलिगढमधील भाड्याच्या खोलीची झडती घेण्यात आली.

 

तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, फैजानने भारतातील आयएसआयएसच्या कारवायांना समर्थन देण्यासाठी सोशल मीडियाच्या व्यासपीठाद्वारे त्याचे सहकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींसह गुन्हेगारी कट रचला होता. फैजान विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघटनेचा प्रचार, प्रसार करण्यात गुंतला होता, ज्याचा उद्देश आयएसआयएसच्या वतीने भारतात ‘हिंसक दहशतवादी हल्ले’ करणे हा होता.

हे ही वाचा:

मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा विराट अवतार

नग्न धिंड प्रकरणातील मैतेई जमातीच्या आरोपीचे मैतेई महिलांनी जाळले घर

‘भारतातील आयएसआयएसचे जाळे वाढवण्यासाठी, नव-धर्मांतरितांना कट्टरपंथी बनवण्यात आणि त्यांना दहशतवादी गटाकडे आकर्षित करण्यात फैजान सक्रियपणे सहभागी होता. तो भरती प्रक्रियेत त्याला मार्गदर्शन करत असलेल्या विदेशस्थित आयएसआयएसच्या हस्तकांशी संपर्कात होता,’ असा एनआयएचा दावा आहे.
त्याच्यावर १९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय कटातील सर्व घटकांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Exit mobile version