राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)इसिस पुणे मॉड्यूल प्रकरणातील चार आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. मोहम्मद शाहनवाज शफीउज्जमा आलम उर्फ शफी उज्जामा उर्फ अब्दुल्ला , रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान असे प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या फरार संशयितांची नावे आहेत.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए )इसिस पुणे मोड्यूल प्रकरणातील चार आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज शेख (डायपरवाला) आणि लियाकत खान हे दोन आरोपी २०२२मध्ये ओमानला पळून गेले आहेत. एनआयए कडून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर मार्गांचा वापर करून त्याचा पाठपुरावा करत आहे आणि नोडल एजन्सी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला प्रकरणाशी संबंधित सर्व तपशील देण्यात आला आहे.
तपासात असे आढळून आले आहे की फैय्याज शेखच्या दुकानात इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवणे, तयार करणे आणि चाचणी करणे यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व आरोपींचा सहभाग होता. पुण्यातील कोंढवा परिसरात डायपरचे दुकान असल्यामुळे डायपरवाला म्हणून ओळखले जाणारा फैयाज शेख हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, शमील नाचन आणि अकीफ नाचन हे दोन अन्य आरोपी फैयाज शेख यांच्या घरी एक दिवस थांबले होते, कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी त्यांनी स्फोटक साहित्य घेऊन पुण्यात आले होते.लियाकत खान हा देखील पुण्याचा रहिवासी असून फैयाज शेखशी त्याचे संबंध आहेत. तोही या कार्यशाळेत सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा:
हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला
पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ
फैयाज शेख आणि लियाकत खान हे दोघेही कट्टरपंथी बनले होते आणि मॉड्युलचा मास्टरमाईंड इम्रान खानच्या सूचनेनुसार त्यांनी कार्यशाळेची व्यवस्था केली आणि इतर संशयितांना त्यांनी आमंत्रित केले, असे सूत्रांनी सांगितले.लियाकत खानची पत्नी आणि मुलगी २ मे २०२२ रोजी ओमानला रवाना झाली, तर लियाकत खान स्वत: १२ ऑगस्ट २०२२ रोजी निघून गेला. त्याचप्रमाणे फैयाज शेखची पत्नी आणि दोन मुले १२ जून २०२२ रोजी ओमानला रवाना झाली आणि १५ जुलै रोजी त्यांनी त्याचा पाठपुरावा केला.
शफीउज्जमा आलम हा इसिस रतलाम मॉड्यूलचा अल-सुफा मास्टरमाइंड इम्रान आणि युनूससोबत कोंढवा येथील मीठानगर येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. घराची झडती घेतली असता तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि सध्या तो फरार आहे.