काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून आली होती. मात्र, आता गोल्डी ब्रार याचा एक कथित व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने आपण अमेरिकेत नसून, आपल्याला अटकही झाली नसल्याचा दावा केला आहे.
गोल्डी ब्रार याला अमेरिकमधील कॅनिफोर्निया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच भारतात आणलं जाणार असून, तो पंजाब पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी माहिती २ डिसेंबरला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली होती. भगवंत मान यांनी गृहमंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाची वाट न पाहताच जाहीर करुन टाकले होते.
परंतु सध्या गोल्डी ब्रारचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. गोल्डी ब्रारने युट्यूबवर सतिंदरजीत सिंग या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला अटक केल्याचा दावा खोडून काढला आहे. मात्र या मुलाखतीत किती तथ्य आहे याची पडताळणी अद्याप झालेली नाही. व्हिडीओतील व्यक्ती आपण गोल्डी ब्रार असल्याचे सांगत आहे. तसंच आपण अमेरिकेत नसून, अटकेची कारवाई झाली नसल्याचंही सांगत आहे. मुलाखतीतील ऑडिओ क्लिपलमध्ये संबंधित व्यक्ती भगवंत मान यांचे दावे फेटाळून लावत आहे.
हे ही वाचा:
जी-२०च्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गैरहजर
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असणाऱ्या गोल्डी ब्रारने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर त्याच्याविरोध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.