विषप्राशन करून नवदाम्पत्याने संपविले जीवन

विषप्राशन करून नवदाम्पत्याने संपविले जीवन

वरळी नवदाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी कोविड आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी ओर्लि पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून तपास सुरू आहे.

अजय कुमार (३४) आणि सूझा एस (३०) असे या आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मूळचे केरळचे राहणारे आहेत. अजय कुमार हा खाजगी कंपनीत नोकरी होता तर सुझा ही बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरीला होती. बुधवारी सुझा हिची आई केरळ येथून सतत सुझाला मोबाईलवर फोन करीत होती, मात्र मुलगी आणि जावई फोन उचलत नसल्यामुळे सुझाच्या आईने मुलीची मैत्रिणीला फोन करून काय झाले बघण्यास सांगितले.

हे ही वाचा:

ऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज!

अकरावीच्या सीईटी प्रवेशात संकेतस्थळ नापास

रेल्वे सर्वसामान्यांना खुली करण्यासाठी दबाव वाढला

अनिल देशमुख, ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

सुझा ची मैत्रीण गुरुवारी दुपारी घरी आली असता आतून दरवाजा बंद होता, तिने बराच वेळ दाराचे बेल वाजवूनही दार उघडत नसल्याचे बघून शेजाऱ्यांना कळवले. दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दार तोडून आत प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालय येथे पाठवण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत या दोघांनी म्हटले होते की, आम्हाला कोविड झाला होता. त्यातून आम्ही बरेदेखील झालो. मात्र त्यानंतर देखील आम्हाला त्रास होत असल्यामुळे या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत असे लिहले होते. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version