वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. ज्या रुग्णालयात या १३ वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत ११ कवट्या आणि ५४ हाडे सापडल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला पूर्वीच अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या डॉ. रेखा कदम यांच्या सासू आणि एका परिचारिकेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेचा ३० हजार रुपयांत अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप डॉ. रेखा कदम यांच्यावर असून आता त्यांनी यापूर्वीही अनेक गैरप्रकार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्वी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून डॉ. रेखा कदम यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट

लडाख प्रशासनाने उर्दूबद्दल घेतला हा मोठा निर्णय

मेहता पब्लिकेशन हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात अवैधरित्या गर्भपात करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. १३ वर्षांच्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई- वडिलांनी पीडितेचा ३० हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी आर्वी शहरात असलेल्या नामांकित मॅटर्निटी होमच्या डॉ. रेखा कदम यांच्यासह एकूण तिघा जणांना आर्वी पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले अवशेष आढळून आले आहेत. या प्रकरणी आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू शैलजा कदम यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version