24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामातस्करीचा नवा प्रयोग, खाद्यपदार्थाच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ

तस्करीचा नवा प्रयोग, खाद्यपदार्थाच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ

पाच किलोच्या केक मधून अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त

Google News Follow

Related

परदेशातून हवाई मार्गाने गैर पद्धतीने पार्सलमधून तस्करी होण्याच्या घटना या अगोदर बऱ्याच वेळा घडल्या आहेत. मात्र अमली पदार्थांची तस्करी होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. यामध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ने ही कारवाई केली असून, या घटनेची खबर डीआरआयला अमेरिकेतून मिळाली होती. तसेच डीआरआय मुंबईने मंगळवारी रात्री की कारवाई केली असून यामध्ये साडे तीन किलो वजनाचा एक पार्सल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित तस्करीची माहिती अमेरिकेतील एका कुरियर कंपनी कडून डीआरआयला मिळाली होती. एका खाद्यान्नाच्या खोक्यातून आमली पदार्थ मुंबई टपाल कार्यालयत लपविण्यात आला होता. हे आमली पदार्थाचे पार्सल मुंबईहून हैद्राबादला पाठवणार होते. त्या अगोदर हा माल दिल्ली येथे बदलण्यात जाणार होता. तसेच डीआरआय तपास पथकाने यावर कारवाई केली असता त्यामध्ये दोन आरोपीना अटक केली आहे.

हे ही वाचा:

कॅलिफोर्नियात अपहृत पंजाबी कुटुंबातील ४ जणांचे सापडले मृतदेह

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

पकडण्यात आलेल्या व्यक्ति पैकी एक जण हैद्राबाद येथील रहिवासी असून, तोच या घटनेचा म्होरक्या असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तस्करीची मागणी करण्यासाठी ‘डार्क वेब’ या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. तस्करीचा आर्थिक व्यवहार हा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आला होता. या साडे पाच किलो केकच्या तस्करीमध्ये एकूण २ कोटी ३६ लाख रुपयांचा गांजा आढळून आला आहे. अशी माहिती डीआरआयच्या तपासात समोर आली आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा