‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे पुण्यात ‘पिट्याभाईं’ची पोलिसांनी काढली परेड

पुणे शहराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे पुण्यात ‘पिट्याभाईं’ची पोलिसांनी काढली परेड

पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. काही दिवसांपुर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अशातच पुणे शहराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. यानंतर पुण्यातील सर्व गुंडांची त्यांनी ओळख परेड घेत शहरातील छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढली.

पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आज हजर करण्यात आले. यावेळी गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती. यावेळी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिस सतर्क झाले असून यासाठी पावले उचलली जात आहेत.

सर्व गुंड एका रांगेत उभे असताना एक गुंड त्या रांगेत मिशी पिळत होता त्याला अमितेशकुमार यांनी पुढे बोलावले आणि काय करत होतास असे विचारले. त्याने लगेच मिशी पुन्हा खाली घेतली.

हे ही वाचा:

निवृत्त सैनिक बनला होता लष्करचा दहशतवादी, दिल्लीतून अटक!

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

मध्यप्रदेशातील फटाका कारखान्यात स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू तर ६० जण जखमी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास २०० ते ३०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. यावेळी पोलिसांनी त्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी काय पावले उचलायची याचे मार्गदर्शन केले. गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वांच्या हालचालींवर बारीक लक्ष असणार आहे, असंही पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version