30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामामुंबईत दंड वसुलीसाठी आता 'ही' नवी मोहीम

मुंबईत दंड वसुलीसाठी आता ‘ही’ नवी मोहीम

Google News Follow

Related

मुंबई वाहतूक पोलीस थकीत ई-चालान रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ई-चालान रक्कम गोळा करण्यात अनेक समस्या आहेत, ज्याचे निराकरण लोकअदालतद्वारे करण्यात येणार आहे. ही लोकअदालत तीन दिवस चालणार आहे, ज्याद्वारे किमान २ लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढली जातील. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सुमारे ४३२ कोटी रुपयांचा दंड वसूल करणे बाकी आहे.

जे लोक वाहतुकीचे नियम मोडतात त्यांना ई-चालानद्वारे दंड केला जातो, पण लोक दंड भरत नाहीत. दंडाची रक्कम गोळा करण्यासाठी, वाहतूक पोलिस कॉल सेंटरवरून फोन करतात आणि लोकांना दंड भरण्यास सांगतात, मग वाहतूक हवालदार ५० टीम बनवतात आणि लोकांच्या घरी जाऊन दंडाची रक्कम गोळा करत आहे. वाहतूक पोलीस दंडाची रक्कम कॉल सेंटरद्वारे गोळा करत आहेत, घरी जात आहेत परंतु दंड गोळा करण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळं हा प्रश्न लोकअदालत द्वारे निकाली काढली जाणार आहे.

वाहतूक पोलिसांनुसार,जेव्हा वाहतूक पोलिस ई-चालानची थकबाकी वसूल करण्यासाठी जातात किंवा त्यांना कॉलद्वारे पैसे भरण्यास सांगतात. तेव्हा काही लोक पैसे देणे टाळतात. लोकं वाहतूक पोलिसांना सांगतात की त्यांना पाठवले गेलेले ई- चालान हे चुकीचे आहे. जेव्हा वाहतूक पोलिसांना ई चालान द्वारे आकारलेला दंड वसूल करायचा असतो तेव्हा ते करू शकत नाही कारण लोकं तेव्हा टाळतात करतात. काही लोक तक्रार करतात की त्यांना दिवसातून दोन वेळा नो पार्किंगसाठी दंड आकारण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

वर्ष २०१६ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत एकूण २०९९६२०० ई-चलनद्वारे दंड ठोठावण्यात आले आहेत, ज्यांची एकूण रक्कम ६८० कोटींपेक्षा अधिक रुपये आहे, त्यापैकी २४८ कोटींपेक्षा ३१ जुलैपर्यंत प्राप्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांना अद्याप वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ४३२ कोटी वसूल करणे बाकी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा