‘बुल्ली बाई’ प्रकरणी नेपाळी नागरिकाने दिले मुंबई पोलिसांना आव्हान

‘बुल्ली बाई’ प्रकरणी नेपाळी नागरिकाने दिले मुंबई पोलिसांना आव्हान

बुल्ली बाई प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई सायबर सेलला यासंबंधी अटक आरोपी विशाल कुमार झा याचे कोणतेही आर्थिक व्यवहार आढळून आलेले नाहीत. मात्र या मध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय असून त्यासाठी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणार आहे. आरोपी श्वेता सिह ही नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या सूचनेनुसार हे काम करत असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सिंहकडून मिळालेल्या माहितीनुसार, गियू नावाचा नेपाळी नागरिक तिला ऍपबद्दल सूचना देत होता.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार “आम्हाला संशय आहे की आरोपींना या कामासाठी निधी दिला गेला असावा.” @Giyu44 नावाच्या ट्विटरवरील खातेधारकाने ट्विट केले आहे की तो बुल्ली बाई ऍपचा निर्माता आहे आणि ज्यांना यामध्ये अटक करण्यात आली आहे ते या प्रकरणात निर्दोष आहेत आणि त्याचा काहीही संबंध नाही.

हे ही वाचा:

मोदी अडथळा बनलेत…

ठाकरे सरकारची दडपशाही सुरूच! भाजपाचे जितेन गजारिया यांच्या कार्यालयात सायबर पोलीस

ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद

 

मुंबई सायबर सेलने आरोपी झा याला अटक केल्यावर राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी याबाबत ट्विट केले. बुधवारी पाटील यांचे ट्विट रिट्विट करत @Giyu44 यांनी स्वतःला ऍपचा निर्माता म्हटले आहे. @giyu44 याने ट्विट मध्ये पोलिसांना आरोपीला ऍपचा युनिक आयडी विचारण्यास सांगितले आहे, कारण हा युनिक आयडी केवळ ऍपच्या निर्मात्याकडेच युनिक आयडी आहे, तो युनिक आयडी अटक आरोपीकडे मिळणार नाही असा देखील दावा या नेपाळी नागरिक असलेल्या तरुणाने केला आहे.

Exit mobile version