ऑलिम्पिकमधून परतलेल्या भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना शेजाऱ्यांनी धमकी द्यायला सुरुवात केली आहे. घराची दुरुस्ती करू नये म्हणून धमकावले जात आहे. जाधव टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील त्याच्या सराडे गावात त्याच्या कीर्तीचा हेवा करणारे शेजारी त्यांना आता धमकी देताहेत. प्रवीणच्या कुटुंबीयांनी पीटीआयला सांगितले की, ‘सकाळी एका कुटुंबातील पाच-सहा लोक आले आणि माझ्या आई-वडिलांना, काकांना आणि काकूंना धमकावू लागले. आम्हाला आमचे घर दुरुस्त करायचे आहे. पण हे शेजारी ते करू देत नाहीत.
जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य एका झोपडीत राहत होते, पण सैन्यात भरती झाल्यानंतर मात्र पक्के घर बांधण्यासाठी काढले असता आता शेजारी अतिशय त्रास देऊ लागले आहेत. घर दुरुस्त करू नका अशी धमकी दिली जात आहे. आम्ही वर्षानुवर्षे या घरात राहत आहोत आणि आमच्याकडे सर्व कागदपत्रे असल्याचे प्रवीण जाधवने म्हटले आहे.
घडलेल्या प्रकरणाबद्दल सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी जाधव कुटुंबाला पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. आम्हाला लेखी स्वरूपात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असे बन्सल यांनी पीटीआयला सांगितले. जमिनीचा वाद आहे. आर्मी कर्नलचा फोन आल्यानंतर मी माझ्या स्थानिक प्रभारींना तपासासाठी पाठवत आहे. नक्कीच त्याला पूर्ण कायदेशीर मदत मिळेल.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार विरोधात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
शरद पवारांनी का घेतली अमित शहांची भेट?
व्वा रे व्वा! मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा !
घडलेल्या वादासंदर्भात जाधव म्हणाले, माझे कुटुंब अस्वस्थ आहे त्यातच मीही तिथे नसल्यामुळे शेजारी अधिक फायदा घेत आहेत. म्हणूनच आता जाधव यांनी घडलेली गोष्ट लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगितली आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून प्रवीण जाधव आलेला आहे. प्रवीण जाधवची प्रगती ही संघर्षातूनच झालेली आहे. प्रवीण जाधवचे वडील रोजंदारीवर काम करणारे.