परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

शिवसेनेच्या खासदार, आमदारांना तुरुंग अधिकाऱ्यांचा सल्ला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. येत्या २२ ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरुंगात नेण्यात आले आहे. तिथे भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना परवानगी देण्यात आली नाही.

संजय राऊत यांना भेटण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. पण या खासदार आणि आमदारांनी अशी परवानगी घेतली नव्हती. तरीही आम्हाला संजय राऊत यांना भेटू द्या, अशी त्यांची मागणी होती. एक खासदार आणि दोन आमदार राऊत यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्ताच्या नात्यातील व्यक्तिव्यतिरिक्त अन्य कुणालाही परवानगीविना राऊत यांना भेटता येणार नाही. नियमानुसारच आरोपींना भेटण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

सध्या संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना वगळता अन्य कुणालाही संजय राऊत यांना भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. सुनील राऊत यांनी तुरुंग अधिकारी नितीन वायचळ यांना विनंती केली होती की, संजय राऊत यांना वायचळ यांच्या कार्यालयात भेट घेऊ द्यावी. पण ती विनंती फेटाळण्यात आली. इतर कैद्यांची भेट जशी त्यांच्या नातेवाईकांना घेऊ दिली जाते तशीच भेट संजय राऊत यांचीही घेता येईल, त्यांना वेगळी सूट मिळणार नाही, असे स्पष्टपणे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिठाचा खडा

देवगिरीचे रहस्य

 

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले होते आणि त्यांचीही तब्बल १० तास चौकशी झाली होती.

Exit mobile version